Nexon.ev Facelift To be Unveil Tomorrow टाटा मोटर्स येत्या काही दिवसात २ मोठे लाँच करणार आहे. येत्या 14 सप्टेंबरला कंपनी नुकतीच लाँच करण्यात आलेली नेक्सॉन फेसलिफ्ट लाँच करणार आहे. या दिवशी कंपनी या कारची किंमत जाहीर करणार आहे. पण याव्यतिरिक्त कंपनी नेक्सॉन डॉट ईव्हीचे फेसलिफ्ट व्हर्जनही एकाच वेळी लाँच करणार आहे. मात्र, 7 सप्टेंबररोजी टाटा मोटर्स या कारचे जागतिक स्तरावर अनावरण करणार आहे. उद्या म्हणजेच 7 सप्टेंबर रोजी या कारचे एक्सटीरियर आणि इंटिरिअर समोर येणार असून त्यासोबत इतर फीचर्सची ही माहिती देण्यात येणार आहे. पण 14 सप्टेंबरला दोन्ही कार (टाटा नेक्सॉन फेसलिफ्ट आणि टाटा नेक्सॉन डॉट ईव्ही फेसलिफ्ट) लाँच होतील आणि किंमतीची माहिती मिळेल.
Nexon.ev Facelift डिझाइन काय असेल?
कंपनीने टाटा.ईव्हीच्या एक्स प्लॅटफॉर्मवरून एक टीझर व्हिडिओ जारी केला आहे. टीझर व्हिडीओमध्ये कारच्या एक्सटीरियर आणि इंटिरियरची झलक पाहायला मिळत आहे. कारच्या एक्सटीरियरमध्ये हलके बदल पाहायला मिळतात. टीझर व्हिडिओमध्ये कारचा रंग शुद्ध राखाडी दिसत आहे.
कारच्या फ्रंटमध्ये मोठा बदल पाहायला मिळत आहे. कारमध्ये एलईडी डीआरएलचा नवा सेट पाहायला मिळणार आहे. बोनेटवर एलईडी बारसह कनेक्टिव्हिटी दिसेल. एलईडी हेडलाइट्स देखील अपडेट केले जाऊ शकतात, ग्रिलमध्ये बदल दिसू शकतो आणि मध्यभागी टाटा मोटर्सचा लोगो दिसू शकतो.
Nexon.ev Facelift ईव्ही चा बाह्य भाग
कनेक्टिंग एलईडी बारसह या कारच्या मागील बाजूस एलईडी टेललाईट मिळू शकतात. नेक्सॉन फेसलिफ्ट एसयूव्हीप्रमाणेच या कारमध्येही टेललाइट्समध्ये अनुक्रमिक पॅटर्न पाहायला मिळतो. कारमध्ये रिडिझाइन केलेले अलॉय व्हील आणि रूफ रेल मिळू शकतात.
टाटा नेक्सॉन डॉट ईव्हीचे इंटिरियर
इंटिरिअरबद्दल बोलायचे झाले तर या कारमध्ये १०.२५ इंचाचे टचस्क्रीन युनिट मिळू शकते. या कारमध्ये टू स्पोक व्हील स्टीअरिंग मिळण्याची शक्यता आहे. मात्र, बॅटरी पॅकमध्ये कोणताही विशेष बदल दिसून येत नाही. या कारला ३०.२ किलोवॅटची बॅटरी मिळेल, सिंगल चार्जवर ३१२ किलोमीटर चालेल. तर मोठी ४०.५ केडब्ल्यूएच बॅटरी ४५३ किमीची रेंज देते.